डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा | परदेशात बनवलेल्या चित्रपटांवर 100% टॅरिफ, हॉलिवूडला 'राष्ट्रीय सुरक्षेचा धोका' जाहीर


 वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी चित्रपटांवर 100% आयात कर लावण्याची मोठी घोषणा केली आहे. हॉलिवूड इंडस्ट्रीसमोरील आर्थिक संकट आणि चीनसोबतच्या व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे पाऊल उचललं आहे. त्यांनी या गोष्टीला राष्ट्रीय सुरक्षेचा धोका असल्याचंही म्हटलं आहे.


ट्रम्प यांनी Truth Social या सोशल मीडियावर लिहिलं की, “अनेक देश अमेरिकेच्या चित्रपट दिग्दर्शकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सवलती देत आहेत. यामुळे हॉलिवूडचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. आता अमेरिका गप्प बसणार नाही.”


हॉलिवूडच्या ढासळत्या स्थितीवर चिंता

चीनने अलीकडेच अमेरिकन चित्रपटांच्या कोट्यात कपात केली आहे, ज्यामुळे हॉलिवूडच्या कमाईवर मोठा परिणाम झाला आहे. वॉल्ट डिस्ने, वॉर्नर ब्रदर्स आणि पॅरामाउंट सारख्या मोठ्या स्टुडिओंवर याचा थेट परिणाम झाला आहे.

"परकीय चित्रपटांमुळे देशांतर्गत इंडस्ट्री अडचणीत" – ट्रम्प

ट्रम्प म्हणाले की, “बाहेरील देशांचे चित्रपट मोठ्या प्रमाणावर अमेरिकन बाजारात येत आहेत, जे आपल्या स्थानिक स्टुडिओंना मोडीत काढत आहेत. हे केवळ आर्थिकच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे.”

चीनचा आक्षेप – अमेरिकन चित्रपटांवर मर्यादा वाढणार?

चीन फिल्म प्रशासनाने 10 एप्रिल रोजी स्पष्ट केलं की, “अमेरिकेच्या चुकीच्या टॅरिफ धोरणामुळे चीनमधील प्रेक्षकांचा अमेरिकन चित्रपटांवरील विश्वास उडतोय.” त्यामुळे अमेरिकन चित्रपटांच्या चीनमधील प्रदर्शनावर आणखी मर्यादा येऊ शकतात.

ट्रम्प यांची टॅरिफ धोरणे – जागतिक व्यापारात मोठा धक्का?

ट्रम्प यांनी याआधीही अनेक देशांवर 10 ते 50% दरम्यान टॅरिफ लावली होती, परंतु चीनसाठी ही दर आता 125% पर्यंत पोहोचली आहे. या नव्या घोषणेमुळे जागतिक चित्रपट बाजारात एक नवीन वाद सुरू होण्याची शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या